Posts

Solo Trek -किल्ले लोहगड🚩

Image
 माझा तिसरा ट्रेक जो नकळत solo trek झाला. लेख छोटा आहे पण मस्त आहे किल्ले लोहगड   खूप दिवस झाले होते कोणता ट्रेक केला नव्हता .या वेळी मात्र मी हा ट्रेक ठरवून आणि पूर्ण नियोजन करून करायचा अस ठरलं. मल्हारगड आणि शिवनेरी किल्ला पाहून आल्यावर माझ्या मनात दुसरा एखादा किल्ला पाहण्याचा विचार आला , मग जरा शोध घेतला नंतर मला सर्वात जवळ असलेला लोहगड आणि विसापूर किल्ला गूगल बाबा वर दिसला जाण्याचे ठरवले. जवळच्या सर्व मित्रांना फोन केले गाठी भेटी घेतल्या बारावी बोर्डाचे पेपर जवळ आले होते म्हणून कोणी यायला तयार नव्हते मग अखेर चा फोन माझा जवळचा मित्र ओंकार ला लावला, तो सुद्धा माझ्यासोबत कराटे क्षेत्रात उत्तम प्रकारे मार्गदर्शन आणि प्राविण्य प्राप्त केले आहे तसेच तो शारीरिक दृष्ट्या सुदृढ आहे तेव्हा तो आपण जाऊ असे म्हणाला.          जागा ठरली होती लोहगड तारीख पण ठरली 12 मार्च 2018 जायचं कसे तर सायकल वर जायचं ठरलं पण त्याच्या कडे सायकल नव्हती तर त्याला एका मित्राची सायकल घेऊन दिली सकाळी मी त्याला फोन केला तेव्हा तो उठला नव्हता  मी आवरून तयार झालो त्याला फोन केल...

किल्ले शिवनेरी🚩

Image
  ✌️😇माझ्या आयुष्यातील दुसरा ट्रेक हा पण न कळत झालेला किल्ले शिवनेरी  माझा पहिला ट्रेक डिसेंबर महिन्यात पूर्ण झाला दुसरी सत्र परीक्षा झाल्यावर आमची उन्हाळी सुट्टी सुरू झाली  व कुठे तरी बाहेर फिरायला जायचं या उद्देशाने तयारी सुरू झाली. हा माझा दुसरा ट्रेक होता  या वेळी सुद्धा मी ट्रेक ला जायचं अस ठरवलं नव्हते की एखाद्या किल्ल्याला भेट द्यायांची म्हणून मी गेलो नव्हतो. अखेर ठरले मी माझा भाऊ आदित्य आणि वडिलांसोबत मोटारसायकल वरून आम्ही  विघ्नहर (ओझर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणूनही ओळखले जाते. सकाळी आम्ही  लवकर निघालो किल्ल्याची काहीही माहिती नसताना आम्ही केवळ गणपती बाप्पा च दर्शन घेऊन परतणार होतो. चाकण,मंचर मार्गे आम्ही जुन्नरला निघालो नारायणगाव मध्ये आम्ही मस्तपैकी मिसळ खाल्ली ती मिसळ मला इतकी आवडली की नंतर मी जवळपास सर्व ट्रेक ला मिसळच खाल्ली . नारायणगाव पासून अवघ्या 8 की.मी. वरच ओझर गाव आहे  गावामध्ये प्रवेश करताच लांबून कुकडी नदीकाठी...

किल्ले मल्हारगड

Image
 किल्ले मल्हार गड कोणत्याही गोष्टीची सुरुवात  होणे महत्त्वाचे असते, माझ्या ट्रेकची सुरुवातच अशी झाली ना, मला मुळातच नव्हते माहिती की आम्ही एका किल्ल्यावर जाणार आहे.जो किल्ला मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा सर करणार होतो तो किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामधील तो शेवटी बांधलेला किल्ला होता,म्हणजेच पुण्यातील सासवड जवळील किल्ले मल्हारगड जो शिंदेवाडी गावात वासलेला आहे          मी तेव्हा आठवी ला होतो गड किल्ले यांबाबत थोडीफार पण माहिती नसणारा मी,महाराजांबद्दल चौथी च्या पुस्तकात जेवढे माहिती तेवढंच. खर सांगायचं म्हणजे मला  मॅरेथॉन काय असते ते सुद्धा नव्हते माहिती        अशाच एके दिवशी मी कराटे class मध्ये माझी कसरत करत होतो तेव्हाच रवी सर उर्फ कोंडाजी घोडके सर कमी मोठा भाऊच जास्त तो म्हणाला मॅरेथॉन ला येतो का त्याला एक पार्टनर हवा होता. पुण्यात एक सगरमाथा गिर्यारोहण संस्था कार्यरत होती ती जर वर्षी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करते ते सुद्धा गडकिल्ल्यावरून  या वर्षी मी आणि रवी दादा ही त्यात सहभागी होऊ इच्छित होत...