किल्ले मल्हारगड

 किल्ले मल्हार गड


कोणत्याही गोष्टीची सुरुवात  होणे महत्त्वाचे असते, माझ्या ट्रेकची सुरुवातच अशी झाली ना, मला मुळातच नव्हते माहिती की आम्ही एका किल्ल्यावर जाणार आहे.जो किल्ला मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा सर करणार होतो तो किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामधील तो शेवटी बांधलेला किल्ला होता,म्हणजेच पुण्यातील सासवड जवळील किल्ले मल्हारगड जो शिंदेवाडी गावात वासलेला आहे


         मी तेव्हा आठवी ला होतो गड किल्ले यांबाबत थोडीफार पण माहिती नसणारा मी,महाराजांबद्दल चौथी च्या पुस्तकात जेवढे माहिती तेवढंच. खर सांगायचं म्हणजे मला  मॅरेथॉन काय असते ते सुद्धा नव्हते माहिती 

      अशाच एके दिवशी मी कराटे class मध्ये माझी कसरत करत होतो तेव्हाच रवी सर उर्फ कोंडाजी घोडके सर कमी मोठा भाऊच जास्त तो म्हणाला मॅरेथॉन ला येतो का त्याला एक पार्टनर हवा होता. पुण्यात एक सगरमाथा गिर्यारोहण संस्था कार्यरत होती ती जर वर्षी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करते ते सुद्धा गडकिल्ल्यावरून  या वर्षी मी आणि रवी दादा ही त्यात सहभागी होऊ इच्छित होतो, तो म्हणाला आज रात्री निघावं लागेल सासवड जवळ शिंदेवाडी गाव आहे तिथे आहे मॅरेथॉन

        कराटे क्लास वरून घरी गेल्यावर घरच्यांकडून परवानगी मिळावी म्हणून मी वडिलांना विचारले ही पहिली वेळ होती म्हणून त्यांनी न काही बोलत मला जाण्यास सांगितले, मी दादा ला फोन केला आणि मी तयार आहे  असं सांगितलं रात्री जवळपास 9 वाजता तो घरी आला व अम्ही निघालो 


‌      देहू ते मोशी ते आळंदी इतका प्रवास केला तेव्हा तिथे मला त्याच संस्थे मधील  एका अनुभवी गिर्यारोहकाशी मैत्री झाली राजेश सर पुढे यांची मला खूप मदत झाली त्यांच्या विषयी अजून माहिती पुढे मिळेलच  ,आम्ही त्यांसमावेत दिघी रोड ने दिवेघाटातून  आम्ही शिंदेवाडी मध्ये पोहचलो रात्री इतकी गर्दी होती सकाळच्या मॅरेथॉन साठी ते बघूनच माझी अर्धी जिरली सहभाग नोंदणी साठी आम्ही गेलो तिथे 2 गट होते खर तर आम्ही दहा किमी साठी पळणार होतो पण त्या गटातील नावे पाहून आम्ही माघार घेतली नंतर 22 की.मी. स्पर्धेत कोणीच नव्हते मग दोघांनी विचार केला आणि हळू हळू  पळून पूर्ण करू असा विचार केला.प्रवेश फी भरली उद्या साठी कसे पळायचे थोडीशी योजना आखली नंतर आम्ही सर्व जण झोपी गेलो

          सकाळी लवकर उठून जरा थोडा व्यायाम केला रवी दादा क्रीडा शिक्षक असल्याने तो शारीरिक क्षमता चांगली होती पण मी कधी नीट 2 कमी पळालो नव्हतो ना मला मॅरेथॉन म्हणजे काही माहिती होते आणि आज 22 की.मी. पळणार होतो,मग तर गर्दी विसरलो आणि पळूनच वाट लागेल मग रवी दादा ने थोडा धीर दिला आणि मनाची तयारी केली.


        सकाळी 7.30 ला आमची मॅरेथॉन सुरू झाली  आणि सुरू झाल्या नंतर कळले की ही मॅरेथॉन सरळ रस्त्यावरून नाही तर या सह्याद्रीच्या कणखर डोंगर रंगा तुन होणार  होती मनात म्हणालो आता आलोय तर करू पूर्ण होईल ते होईल गावा जवळील हनुमान टेकडीवरून पहिल्या डोंगरावर जायचं होतं तिथे आमचा पहिला checkpoint होता तिथून कार्ड घेऊन आम्ही दुसर्याबाजूने डोंगर खाली उतरला तिथे दुसरा checkpoint होता खाली उतरायला काही नाही वाटलं पण परत वरती चढायला पूर्ण जीवावर आलं कसं बस धावतपळत तो डोंगर चढलो वर गेल्यावर तिथल्या वोलेंटर ने आम्हाला पाणी दिल बरं वाटलं जीवाला नंतर एकाएकी म्हणाला आता 5 की.मी. झालं आहे,परत पाण्यामार्फत सापडलेलं सुख उन्हात उडून  गेलं त्याच्याकडे रागाने बघत आम्ही पुढे निघालो 

       


तिसऱ्या डोंगरावरून चौथ्या डोंगरावर आम्ही गेलो आणि पाचव्या डोंगरावर  सह्याद्री मधील  कणखर असा मल्हारगड उभा होता तो किल्ला पाहताच मी त्याच्या प्रेमात पडलो आणि थोडा वेळ ते निसर्ग सौंदर्य पाहून विश्रांती घेतली आणि संपूर्ण शिण गेला  पुन्हा आम्ही नव्या जोमाने किल्ल्याकडे कूच केली  किल्याच्या चोर दरवाजमधून आम्ही आत शिरलो तेव्हा मॅरेथॉन मध्ये आम्ही 5व्या क्रमांकावर होतो पण अजून मॅरेथॉन संपली नव्हती किल्ल्यावरील महादेव मंदिरात आम्ही शिवलिंगाचे दर्शन घेतले व तसाच किल्ला पाहून आम्ही किल्ल्याच्या गोमुख महादरवाज्यामधून खाली उतरू लागलो.उतरण्यासाठी असणाऱ्या किल्याच्या पायऱ्या उध्वस्त केल्या होत्या , 1818 मधील ब्रिटिशांनी उध्वस्त केलेल्या किल्यामधील हा एक किल्ला.किल्ला उतरुन 3 ऱ्या checkpoint जवळ आम्ही पोहचलो तिथे आम्हाला थोडा आराम करता आला तिथे अगोदरच एक सहभागी बसले होते आणि तेवढ्यात आम्हाला मागून येनारे अजून एक जण दिसले. वोलेंटर सांगितले की तुम्हांला आलेल्या वाटेने परत जायचे आहे मी तर पूर्ण संपलो होतो दुसऱ्या checkpoint चे कार्ड दाखवून 3रे घेतले आणि निघालो




           आम्ही  पुढे निघालो तेव्हा आम्ही 4 थ्या क्रमांकावर आलो किल्ला पुन्हा चढून आम्ही चोर दरवाज्यातून आत किल्ल्यात प्रवेश केला त्याच अनुषंगाने मला परत किल्ला पाहण्याचा योग आला, आल्यावाटेने आम्ही निघालो वाटेत नेमका माझ्या पायाला वाम (cramp)आला  मग जी जोडी मागून आली होती त्यांनी आम्हाला मदत केली आम्ही परत 5व्या क्रमांकावर आलो , रवी दादाने माझा पाय चोळून थोडा नीट केला व आम्ही निघालो  कधी न पाळलेला मी एवढे पाळल्यावर रवी दादा ला खूप काही वाईट बोललो पण त्याने ऐकून घेतले तो पुढे पळत होता मी त्याच्या मागे मग आम्ही ठरवले उतर आला  की पळायचे आणि चढ आला की चालायचं असं करत करत आम्ही चौथ्या checkpoint वर पोहचलो

3ऱ्या checkpoint च कार्ड दाखवून 4थे घेतले आणि उताराला पळत पळत 4थ्या क्रमांक पुन्हा मिळवला थोडं पुढे गेल्यावर 3 ऱ्या क्रमांकाची जोडीला आम्ही हनुमान मंदिराजवळ मागे टाकले आता अखेर चे 2 की.मी. बाकी होते रास्ता पूर्ण सरळ होता पण माझे पाय नको म्हणत होते तरी मी पळत होतो रवी दादा हाताला धरून पळवत होता energy drink देत होता थोडे फार joke सांगून कसातरी मला पळवत होता थोड्याच वेळात मी पूर्ण जीव सोडला आणि एकाएकी जागेवर थांबलो  आम्हाला मागील मुलांनी cross केले तरी मी जागेवर होतो कारण मला पुन्हा cramp आला होता थोडा वेळ थांबून पुन्हा सुरुवात केली मी आणि रवी दादाने अखेर ती मॅरेथॉन पूर्ण केली.आम्ही 22की.मी. ची मॅरेथॉन एकूण 3 तास 24 मी. पूर्ण केली. आणि 4था क्रमांक पटकावला त्यात आम्हाला 4 हजार रु बक्षीस स्वरूपात मिळाले.बक्षीस वितरण पूर्ण झाल्यावर आम्ही जेवण केले आणि शेजारील बागेतून सीताफळ विकत घेऊन खाल्ली तिकडून घरी परतल्या नंतर 2 ते 3 दिवस माझे पाय आणि शरीर पूर्णपणे दुखत होते 



            माझा पहिला ट्रेक ही पूर्ण झाला ते ही नकळत  त्या दिवशी पासून ठरवले इथून पुढे एक ही मॅरेथॉन पळणार नाही ,पण तेव्हा पासून मला एक आत्मविश्वास भेटला की मी हे करू शकतो मॅरेथॉन ही आणि ट्रेक ही माझ्या मधील क्षमता मला कळली पुढे मी अनेक ट्रेक केले मॅरेथॉन ही पळालो आणि जिंकलो सुध्दा माझी ही पहिली ट्रेक अविस्मरणीय अशी आहे

             


.

Comments

Post a Comment