Solo Trek -किल्ले लोहगड🚩
माझा तिसरा ट्रेक जो नकळत solo trek झाला. लेख छोटा आहे पण मस्त आहे किल्ले लोहगड खूप दिवस झाले होते कोणता ट्रेक केला नव्हता .या वेळी मात्र मी हा ट्रेक ठरवून आणि पूर्ण नियोजन करून करायचा अस ठरलं. मल्हारगड आणि शिवनेरी किल्ला पाहून आल्यावर माझ्या मनात दुसरा एखादा किल्ला पाहण्याचा विचार आला , मग जरा शोध घेतला नंतर मला सर्वात जवळ असलेला लोहगड आणि विसापूर किल्ला गूगल बाबा वर दिसला जाण्याचे ठरवले. जवळच्या सर्व मित्रांना फोन केले गाठी भेटी घेतल्या बारावी बोर्डाचे पेपर जवळ आले होते म्हणून कोणी यायला तयार नव्हते मग अखेर चा फोन माझा जवळचा मित्र ओंकार ला लावला, तो सुद्धा माझ्यासोबत कराटे क्षेत्रात उत्तम प्रकारे मार्गदर्शन आणि प्राविण्य प्राप्त केले आहे तसेच तो शारीरिक दृष्ट्या सुदृढ आहे तेव्हा तो आपण जाऊ असे म्हणाला. जागा ठरली होती लोहगड तारीख पण ठरली 12 मार्च 2018 जायचं कसे तर सायकल वर जायचं ठरलं पण त्याच्या कडे सायकल नव्हती तर त्याला एका मित्राची सायकल घेऊन दिली सकाळी मी त्याला फोन केला तेव्हा तो उठला नव्हता मी आवरून तयार झालो त्याला फोन केल...