Solo Trek -किल्ले लोहगड🚩
माझा तिसरा ट्रेक जो नकळत solo trek झाला. लेख छोटा आहे पण मस्त आहे
किल्ले लोहगड
खूप दिवस झाले होते कोणता ट्रेक केला नव्हता .या वेळी मात्र मी हा ट्रेक ठरवून आणि पूर्ण नियोजन करून करायचा अस ठरलं. मल्हारगड आणि शिवनेरी किल्ला पाहून आल्यावर माझ्या मनात दुसरा एखादा किल्ला पाहण्याचा विचार आला , मग जरा शोध घेतला नंतर मला सर्वात जवळ असलेला लोहगड आणि विसापूर किल्ला गूगल बाबा वर दिसला जाण्याचे ठरवले. जवळच्या सर्व मित्रांना फोन केले गाठी भेटी घेतल्या बारावी बोर्डाचे पेपर जवळ आले होते म्हणून कोणी यायला तयार नव्हते मग अखेर चा फोन माझा जवळचा मित्र ओंकार ला लावला, तो सुद्धा माझ्यासोबत कराटे क्षेत्रात उत्तम प्रकारे मार्गदर्शन आणि प्राविण्य प्राप्त केले आहे तसेच तो शारीरिक दृष्ट्या सुदृढ आहे तेव्हा तो आपण जाऊ असे म्हणाला.
जागा ठरली होती लोहगड तारीख पण ठरली 12 मार्च 2018 जायचं कसे तर सायकल वर जायचं ठरलं पण त्याच्या कडे सायकल नव्हती तर त्याला एका मित्राची सायकल घेऊन दिली सकाळी मी त्याला फोन केला तेव्हा तो उठला नव्हता मी आवरून तयार झालो त्याला फोन केल्यावर तो असं म्हणाला की तो तस बोलेल याचा विचार ही केला नव्हता तो सरळ म्हणाला "मी नाही येत तू जा" मी फोन ठेवला आणि ट्रेक तिथेच संपवणार होतो पण म्हणालो आता ठरलय तर जाऊन येऊ परत जाणे होतं नाही होत
मी सायकल काढली आणि एकटाच निघालो सोबत एक बॅग होती त्यात 2 पाण्याच्या बाटल्या आणी एक t shirt होता. एक लिबु आणि थोडी साखर होती बास,पण कधी इतक्या लांब सायकल चालवली नव्हती हा माझ्या आयुष्यातील नकळत झालेला पहिला solo trek किंवा solo trip सकाळी 6 ला घर सोडल आणि 7 वाजे पर्यंत मी सोमटणे गावाच्या पुढे गेलो 8 वाजता मी कान्हे गावात एका छोट्या चहाच्या टपरीवर चहा प्यायला आणि नंतर पुणे मुंबई मेगा हायवे वरून निघालो ज्या हायवे वर दुचाकी गाड्यांना सुद्धा बंदी आहे त्या हायवे वरून मी सायकल घेऊन निघालो होतो. तेवढ्यात बाजूला पेट्रोल पंप दिसला मग माझ्या मनात विचार आला की सायकल किती महत्वाची असते असाच प्रवास करत करत मी कामशेत गावात 9 वाजता पोहचलो.
जिथून बाजूच्या सर्व्हिस रोड ने मी लोहगड चा रास्ता धरला त्या वाटेने गडाकडे निघालो मेगा हायवेवरून फक्त 5 की.मी. वरच हा गड आहे लोहगडाला लागूनच किल्ले विसापूर आहे विसापूर च्या पायथ्यालाच पाटण हे पुरातन काळातील लेणे आहे. तर लोहगड किल्ल्याकडे जाताना वाटेतच घाट चढायच्या अगोदर भाजे या नावाने प्रसिद्ध असलेले बौद्धकालीन लेणी भेटतात सध्या हे लेणे भारत सरकारने त्यांच्या ताब्यात घेतले आहे
ते पाहून मी सरळ गडाची वाट धरली समोर गड दिसत होता म्हणून सर्व थकवा दूर झाला मी पुन्हा सायकल घेऊन निघालो थोडे फोटो काढत जात होतो ते काढायला कोण नव्हते म्हणून बाजूला दगडाला टेकून फोन मध्ये timer लावून फोटो काढण्याची कला ही अवगत झाली याची पुढे सवयच होणार होती थोडं पुढे गेल्यावर मला घाट लागला घाटाचा उतार इतका आहे की थांबलेली गाडी सुद्धा परत येईल त्यावर मला सायकल चढवणे अवघड जाऊ लागले त्यामुळे मी ती सायकल उतरून तिला ढकलत वर नेत होतो मात्र येताना काय होईल याचा विचार केला नाही ते नंतर सांगतो पण घाट काय संपायच नाव घेईना. अखेर चा पल्ला गाठून घाट सर केला तर उजवीकडे विंचूकडा आणि लोहगड खुणावत तर डाव्या बाजूला विसापूर किल्याची तटबंदी आणि सरळसोट कडा होती. सकाळी 9.30 वाजता मी लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचलो. बाजूला एका बोर्ड ला टेकून सायकल लावली आणि सोबत आणलेले कुलूप आणि साखळी बांधली
थोडा वेळ विश्रांती घेऊन मी गड चढायला सुरुवात केली,गडाला संपूर्ण पायऱ्या असल्याने वर पर्यंत आरामात जात येत मुळात लोहगडची रचना वेगळी केलेली आहे वेडीवाकडी वळणे घेत गडावर जाता येत,हा किल्ला हा अति मजबूत, बुलंद आहे. किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे वर्षांपूर्वी झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या.किल्ल्यावर जाण्यासाठी भक्कम असे 4 दरवाजे आहेत,
यातील पहिल्या म्हणजेच गणेश दरवाज्या जवळ नरबळी देण्यात आला होत्या त्या संबंधित किल्ल्यावरील एकमेव असा शिलालेख आहे व त्याच्या वरच्या बाजूस शिवकालीन तोफा आहेत
नारायण दरवाजा हनुमान दरवाजाच्या पुढे गेल्यावर पाण्याच्या टाक्या आणि धान्य कोठार आहे मात्र त्यात पाणी भरले होते मी त्यातून बाटली भरून पाणी घेतले. महादरवाजा हा गोमुख प्रकारचा आहे त्यातून पुढे गेल्यावरएक दर्गा लागतो.
दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखानाचे भग्न अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याचा घाणा आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तोफ काही हौश दुर्गप्रेमींनी सिंमेटच्या चौथयात बसवलेली आहे. अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी आढळते. या कोठीत राहाण्याची सोय होते.या कोठीत अनेक खोल्या आढळतात. दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवटयाचा भाग आहे, तिथे एक सुंदर शिवमंदिर आहे. पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे. हे तळे अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते. नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली होती. हे तळं सोळा कोनी आहे .मोठ्या तळ्याच्या पुढे विंचुकाट्याकडे जातांना वाड्यांचे काही अवशेष दिसतात.
लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. या विंचूकाट्यास बघून आपल्याला आठवण येते ती म्हणजे राजगडाच्या संजीवनी माचीची. पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचूकड्यावर बसून थोडा वेळ निसर्ग न्याहाळला दुपारी 1.30 वाजले होते सोबत आणलेला लिंबू पाणी प्यायलो
किल्ले लोहगड वरून दिसणारा समोरील बाजूूूस किल्ले विसापूरनंतर गड उतार व्हयला सुरुवात केली वेळ लावून गड उतार झालो तर महादरवाज्यातून खालच्या शेवटच्या पायरी पर्यंत 2.38 मिन मध्ये पोहचलो विश्वास नाही बसणार पण हे खरं आहे खाली आल्यावर समोरच्या हॉटेल मध्ये मस्त पैकी झणझणीत मिसळ खाल्ली तेव्हा एक ट्रेकर शी मैत्री झाली माझ्या पेक्षा वयाने मोठे होते ते दिल्लीतील एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होते. त्यांच्याशी संवाद साधून थोड्या वेळात मी निघालो
पुन्हा त्याच वाटेने पण जेव्हा घाट उतरायला सुरुवात केली तेव्हा मात्र सायकल चे दोन्ही ब्रेक जरी पूर्ण दाबले तरी ब्रेक लागत नव्हता अखेर मी ती सायकल खाली उतरून ढकलत नेली पुन्हा हायवेला लागून सायकल चालवणे सुरू केलं मात्र जाताना पोलिसांनी पकडलं आणि त्यांनी बायपास हायवे ने जाण्यास सांगितले आणि ओरडले सुद्धा सकाळपासून सायकल चालवून गडचढुन इतकी हलत बेकार झाली होती की अजून सायकल चालवायची इच्छा नव्हती म्हणून मी कान्हे गावातून सायकल ट्रेन मध्ये टाकली आहे देहूरोड स्टेशन ला उतरून घरी संध्याकाळी 7 वाजता घरी पोहचलो









Mitra khup chan lekh lihila mi ajun lohagad pahilela nahi pn mala ata tithe janyachifar utsukta lagli ahe dhanyavad 🚩🚩🚩 jay shivray..
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏अशीच साथ देत राहा मी केलेले सर्व भटकंती बद्दल अशीच माहिती देत राहील हेतू इतकाच की आपण ही आपला इतिहास जाणून घ्यावा ,कारण इतिहास जाणून घेतला तरच वर्तमान घडेल🚩🚩🚩
ReplyDeleteजय शिवराय 🚩🙏
मित्रा योग्य माहिती देणारा अप्रतिम लेख आहे⛳⛳
ReplyDeleteधन्यवाद🤗
Delete